Total Pageviews

Tuesday, December 14, 2010

चार पावलं o o o o



वाचनाचा नाद कधी लागला हे आठवत नाही आता, पण वाचनाचे बोट पकडूनच हळू हळू मनातल्या मनात काहीतरी जुळवायला लागलो. सुचतंय ते लिहून वगैरे काढायची अक्कल फारशी नव्हती आधी. नंतर नंतर मात्र मनात बरेच विचार फेर धरायला लागले तेव्हा मात्र त्यांना कान पकडून डायरीत आणायला लागलो. वाचता वाचता आणि डायरी लिहिता लिहिता स्वप्नं पाहायला लागलो - कधीतरी स्वतः नक्की स्वतःचे पुस्तक लिहीन..... आणि जेव्हा केव्हा पुस्तक लिहीन तेव्हा त्याच्या अर्पणपत्रिकेत कोणाची नावे असतील हे पण ठरवलं होतं. नाल तयार होती, घोडा आणणे तेवढे बाकी होते.

नंतर जेव्हा कळून चुकलं , की पुस्तक लिहिण्यासाठी (खरं म्हणजे छापून येण्यासाठी ) लिखाणामध्ये किमान काही दर्जा असावा लागतोतेव्हा पुस्तक छापून येण्याची  स्वप्नं बघणं सोडून दिलंखूप दिवस लोटले आणि अचानक लक्षात आलं की , पुस्तक लिहिण्याची स्वप्नं बघण्यापेक्षा मी ब्लॉग लिहू शकतो !! मनात आलं ते लिहिलं आणि share करावसं वाटलं ते ब्लॉग वर टाकलं, इतका सोप्पा मामला वाटला मला हाअधे मधे थोडं फार सुचत होतं ते कागदावर लिहिलंच होतं; आता ते ब्लॉगवर उतरवता येईल .. वा, छान कल्पना !! त्यात अलीकडे नवीन नवीन बरेच काही वाचायला - अनुभवायला मिळायला लागलं आणि डोक्यात अक्षरांची फुलपाखरं भिरभिरायला लागली ...मग जेव्हा डोक्यात ती मावेनाशी झाली, तेव्हा त्यांच्यासाठी माझ्या बोटांतून वाट फुटली  आणि मी keyboard बडवायला सुरुवात केली ....
ब्लॉग वर काय काय लिहीन मी ?? बघूया .... ठरवलं काहीच नाहीये..... सुचेल तेव्हा, मनात येईल तसे आणि share करावेसे वाटेल ते ... निश्चित असे कोणतेही स्वरूप नाही किंवा फॉर्म सुद्धा नाही  ...  त्यामुळेच ब्लॉगचे नाव ठेवणे अवघड नाही गेले , ते आपोआप डोक्यात आले ... "इत्यादी

एवढं मात्र नक्की की पुढे एकवेळ 'लिहायला काहीच सुचल्यामुळे' ब्लॉगची नंतरची पानं कोरी राहिली, तरी सुरुवातीचं एक पान नक्की भरलेलं असेल - अर्पणपत्रिकेने !! (एकेकाळी पुस्तक लिहिता येणार नाही हे कळल्यावर "आता अर्पणपत्रिका केव्हा आणि कुठे लिहिणार" या विचाराने चिंतेत पडलो होतो ...  नंतर नंतर तर किमान अर्पणपत्रिका लिहिण्यासाठी तरी पुस्तक लिहावसं वाटायला लागलं याचे कारण अर्पण पत्रिकेतल्या 'त्या' दोन व्यक्तींनी मला जे काही दिलंय ते खरच अनमोल आहे).

यापूर्वी कोणता ब्लॉग अर्पणपत्रिकेने सुरु झालाय की नाही माहित नाही , पण मी मात्र (नमनाला घडाभर तेल ओतल्यानंतर का होईना) अशी सुरुवात करतोय ... 'त्या' चार पावलांना नमस्कार केल्यामुळे मी पावलं न अडखळता चालत राहीन अशी अशा वाटते आहे
-----------------------------------------------------------------------------------------------
प्रिय भा.रा.भागवत आणि पु.



भा.रा.: तुमची पुस्तकं वाचायला सुरुवातपण केली नव्हती तेव्हा वाटायचं की 'चटकदार' चव ही फक्त भेळेलाच असते, पुस्तकाला नसतेच मुळी !! आणि ते फास्टर फेणे नावाचं भूत जे माझ्या मानगुटीवर बसवलंत   ते अजूनही उतरायचं नाव घेत नाहीये ...



पु. : जगण्यातली एकही situation अशी नसते ज्यावेळी तुम्ही आणि तुमचे dialog आठवत नाहीत, मग ती situation म्हणजे अगदी जन्म असो ( "रामराणा जन्माला ती  टळटळीत दुपारची वेळ होती...." - मी आणि माझा शत्रुपक्ष'  )  किंवा मृत्यू  ("शेवटी "चांगली बरणी आल्याशिवाय तुमच्या साड्या बोहारणीला देणार नाही" असं बोलल्यावर  पिंडाला कावळा शिवला ...." - पाळीव प्राणी ).  अवघं जगणं किती आनंदी होऊ शकतं हे तुमच्या मुळे कळलं ...



तुम्ही दोघांनी लिहिलं नसतंत तर मला वाचायची आवड लागली असती असं खरोखर वाटत नाही.. आणि वाचायला लागलो नसतो आज हे पांढऱ्यावर काळं (खरेतर काळ्यावर पांढरं) लिहायची काही शक्यताच नव्हती !

तुम्ही दोघेही हयात असताना (किंवा निदान अखेरच्या प्रवासाला निघालात तेव्हा तरी) तुम्हाला नुसतं एकदा बघून तरी यावं हा विचार माझ्या डोक्यात सुद्धा येऊ नये याबद्दल राहून राहून खंत वाटतीये  ......!!!

-----------------------------------------------------------------------------------------------



12 comments:

  1. Apratim!!

    asach lihit ja... kahi tari chan yenaar aahe yatun ajun.... :-)

    ReplyDelete
  2. सुरेख...नावच खुप आवडलं... :) निदान सुरुवात तरी केलीस.वाट पहात आहोत पुढच्या लेखाची.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. waah...chaan......
    finally tu type karayla(lihayala) suruwat keli..
    Tuzi 4 pavl satat padat rahot ashi apeksha..
    All the best..
    amhi pan wat pahat ahot pudhchya lekhachi leka.. :)

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. Abhinandan!!!!!!!!!!!

    khoopch chan vatla....ani tujhee prateyk post vachnyas utsuk ahe!!!:)ani tujhya e-balaveeshayi bolaycha ter nav he bhari ani appearance he bhari!!ter mag all d bst!!!

    ReplyDelete
  7. मस्त लिहिलंयस नमनाला...गप्पाच वाटल्या...

    ReplyDelete
  8. सगळ्यांना मनापासून धन्यवाद !
    पहिल्याच पोस्टला एवढा response अजिबात अपेक्षित नव्हता. म्हणजे, तुम्ही स्वागत कराल हे माहित होते पण just intro म्हणून लिहिलेली पोस्ट एवढी आवडेल असे वाटले नव्हते.
    अंगावर मूठभर मांस चढले आहे,पोटात गोळा पण आलाय पुढे लिहायला सुचले (किंवा आवडले) नाही तर ???

    ReplyDelete
  9. सुंदर लिहितोस! असंच लिहीत रहा, आम्ही वाचत राहूच!

    ReplyDelete
  10. मुला असाच कायम लिहीत रहा! मस्त वाटतं वाचून...
    थोडे कौतुक झाले आता थोडा चिमटा :P
    "रामराणा जन्मला..." हे वाक्य 'असा मी असा मी'तले नसून 'मी आणि माझा शत्रुपक्ष' मधले आहे! :P
    फार तेजोभंग केला तुझा जाते आता...
    लिही पुन्हा,पुन्हा आणि पाठव! :)
    चारुता

    ReplyDelete
  11. @charuta : चूक मान्य आहे .. काल रात्री 'शत्रुपक्ष' ऐकलं तेव्हाच माझी घोडचूक ध्यानात आली ... :)
    पण चूक बेमालूमपणे खपून गेलीये असे वाटत असताना मला तुझ्यासारखी 'सजग वाचक (कि वाचिका ??)' भेटलीच :P
    so लेख आता पुनश्च एडीट केलाय !!!

    ReplyDelete
  12. mast aahe prasad... mi purna post nahi vachu shakle but i liked watevr i read.. keep blogging.. :)

    ReplyDelete