"........ और मेरे लिये वो हर एक शख्स भगवान की तरह है, जो जरुरतमंदोंकी मदद करता है । आपको मेरा प्रणाम भाईसाहब !!" तो बुलंद आवाज सेटवर घुमला. एक सेकंदभर चिडिच्चुप शांतता पसरली.
"कट
ईsssट", डायरेक्टरची आरोळी आली
आणि पाठोपाठ आलेल्या पॅकअपच्या आज्ञेमुळे सेटवर स्पॉटबॉईजची आवरावरीसाठी एकच धावपळ
सुरू झाली. 'तो' अभिनेता अभिनयासाठी
डोळ्यात आणलेले उत्स्फूर्त अश्रू पुसत त्याच्या सेक्रेटरीला जवळ बोलवून म्हणाला,
"पुढची १५ मिनिटे मला कुठलाही डिस्टर्बन्स नकोय....
डायरेक्टर आला तरीही...." आणि तडक आपल्या व्हॅनिटी व्हॅनकडे रवाना झाला.
डायरेक्टर बिचारा "फँटॅस्टिक सर !" एवढे दोन शब्द उच्चारण्यासाठी व्हॅन
बाहेर ताटकळत थांबला.
'त्या'
अभिनेत्याला काही घेणंदेणं नव्हतं. एवढ्या प्रदीर्घ कारकीर्दीत
त्याने असले लाळघोटे - स्पॉटबॉयपासून डायरेक्टरपर्यंत आणि पब्लिकपासून प्रोड्युसर
पर्यंत - कित्येक पाहिले होते. 'कोण कुठले कालचे आर्टिस्ट,
मला फँटॅस्टिक म्हणतात लेकाचे…. आणि वर सल्ले
मागतात. अरे इतकी वर्षं अभिनय जगलोय मी.... कुणीही न शिकवता... स्वतः शिका की
अभ्यास करून. येतात फुकटचा गायडन्स मागायाला. आणि कसले हे डायलॉग !! मदद काय अन्
भगवान काय ... !! रबिश ... ' मनातल्या मनात तो तोफ डागत
होता. त्याचही तसं बरोबरच होतं म्हणा. चाळीसेक वर्षांपूर्वी तो मुंबापुरीत आला
होता तेव्हा कुणीही नव्हता. स्वतःच्या कष्टांनी यशाच्या पायऱ्या चढत आज सिनेसृष्टीचं
सर्वस्व बनला होता. अलीकडे काळाची पावलं बरोबर ओळखून हिरोचे रोल स्वीकारणं बंद
करून अधिकाधिक सकस चरित्र भूमिका स्वीकारू लागला होता... थोडक्यात 'हिरो नंबर वन' राहिलेला नसला तरी 'अभिनेता नंबर वन' तो अजूनही होता. फक्त डोकं आभाळाला
लागल्यामुळे जमिनीवरून पाय सुटले होते. उमेदीच्या काळात त्याला कुणीही मदत न
केल्याचा राग अजूनही त्याच्या मनात होता. 'जे काही मी मिळवलं
होतं ते कुणाच्याही मदतीशिवाय... मग बाकीच्यांना ते मिळवण्यात काय अडचण आहे'
असा त्याचा सोपा युक्तिवाद होता. त्यामुळे आर्थिक परिस्थिती वाईट
असणाऱ्या लोकांबद्दल त्याच्या मनात अढीच होती. 'पैशांची मदत
केली की ते फुकटे बनतात. त्यांना कामं करायला सांगा... एक जण तयार व्हायचा
नाही.... ' असं तो कडवटपणे म्हणायचा. 'सामाजिक
बांधिलकी' वगैरे शब्द त्याच्या डिक्शनरीत नव्हते. लोणी खायचं
माहिती होतं, लोणी घुसळून देणारे हात कुणाचे आहेत याच्याशी
त्याला काहीही घेणंदेणं नव्हतं. आपल्यासारखा अभिनेता अजून जन्माला आलेला नाही यावर
त्याचा ठाम विश्वास होता. थोडक्यात, त्याच्या दृष्टीने तो
अभिनयकलेवर उपकार म्हणूनच जन्मला होता. त्याचं नाव .... जाऊदे नावात काय आहे.. नाव
हवंच असेल तर समजा 'अमुककुमार' ....
बरोबर १५ मिनिटांनी तो व्हॅनिटीच्या बाहेर
आला. अलोट गर्दीकडे उपकार म्हणून कटाक्ष टाकून आपल्या पॉश कारमध्ये बसून निघूनही
गेला. दिवसभराचा शीण आलेला असूनही रअंतरी बेडवर पडल्यापडल्या लगेच झोप लागली नाही
त्याला. कोणतीतरी अदृश्य गोष्ट त्याला बराच वेळ झोपूच देत नव्हती.
दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच लोकेशन, तोच सेट, तीच पब्लिकची गर्दी. फक्त शूटिंग संपवून निघताना मात्र वेगळाच प्रकार घडला. बाजूच्या गर्दीतून एक पोरगा सुसाट आला आणि कारकडे चालत निघालेल्या त्या अभिनेत्याला विनवू लागला,"साहेब, साहेब मदत करा नं प्लीज, खूप गरज आहे हो...." हे शब्द ऐकले मात्र तो अभिनेता त्याच्या अंगावर फिस्कारलाच.... पोरगा एकदम गांगरला. त्याचे डोळे सपाट्याने भरत चालले.. वरचे ओठ खालच्या दातात रुतवत त्याने हुंदका दाबला आणि पुढच्याच क्षणी स्वतःचेच गालफाड फोडत मागे झाला आणि बघ्यांच्या गर्दीत विरघळून गेला. इकडे अमुककुमारला कारमध्ये बसताना कसलीतरी अनामिक भावना होत होती. तो मुलगा त्याला कुणीतरी वेगळाच भासला होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू आपल्या ओरडण्यामुळे आलेले वाटत नव्हते. कसल्यातरी अनामिक दुःखाचे कढ त्याच्या डोळ्यात दाटले होते. 'डोळे !! आत्ता लक्षात आलं काल आपल्याला काय छळत होतं रात्री. हिरवट आणि राखाडी रंगाचे अद्भुत मिश्रण असणारे ते डोळे ! बाजूच्या गर्दीत काल दिसलेल्या याच डोळ्यांनी आपला रात्रभर पिच्छा पुरवला होता. आता आपल्या लक्षात येतंय की आज त्या नजरेत एक आशा होती... सिग्नलवरच्या भिकाऱ्यासारखी लाचारी नव्हती. आपण आपलं त्याला नेहमीच्याच सवयीप्रमाणे हाकलून लावलं होत. छे ! हे काही बरोबर केलं नाही आपण......' आज त्या अभिनयसम्राटाला प्रथमच कुणाविषयीतरी सहानुभूती वाटत होती !
तिसऱ्या दिवशी त्याची नजर त्या मुलाला स्वतःहूनच गर्दीमध्ये धुंडाळतहोती... दिसला ! तो दिसलाच !! गर्दीत अजिबात गडबड, रेटारेटी न करता तो शांतपणे उभा होता. शूटिंग संपलं आणि अभिनेत्याने आपल्या असिस्टंटला बोलवून त्या पोराला घेऊन यायला सांगितलं. मुलगा आला. याने आपल्या खिशातून आपला शुभ्र रुमाल काढला. असिस्टंटकडून पेन घेऊन त्या रुमालावर रुबाबात सही केली आणि रुमाल त्या मुलाला देत म्हणाला, "जा, आईला दाखव. म्हणावं मी स्वतःबोलवून दिली आहे सही. रुमाल विकायचा म्हटलंस तरीही हज्जारो रुपये मिळतील तुला"
"साहेब, स्वर्गात आवाज पोचवेल असा फोन आहे का तुमच्याकडे?",
मुलगा अतिशय थंड पण प्रभावी आवाजात म्हणाला.
अमुककुमार चरकला. आईवेगळ्या मुलाच्या आवाजात एक वेगळाच शांतपणा होता. खूपकाही सोसूनही ठामपणे उभा असल्यासारखा. आता त्याला त्या मुलाबद्दल विलक्षण कुतूहल वाटायला लागलं. तो त्याला घेऊन थेट व्हॅनिटीमध्ये गेला. बाहेरची गर्दी तशीच चरफडत राहिली. व्हॅनिटीमध्ये गेल्यावर त्याने प्रथमच आपादमस्तक न्याहाळलं. वयाने जेमतेम चौदा-पंधरा वर्षांचा असेल. शरीराने काटकुळा. दिसायला तसा सावळाच होता. त्यावर ते भेदक डोळे अत्यंत विजोड वाटत होते. केस विस्कटलेले. कपडे जुने वाटत असलेतरी स्वच्छ होते. पायात चपला नव्हत्या. कदाचित झोपडपट्टीतच राहात असावा. अमुककुमारने त्याचा लाडका प्रश्न विचारला,"माझे पिक्चर फार आवडतात का तुला ? किती आणि कुठले कुठले पाहिलेस आत्तापर्यंत ?"

"मग इथे काय करतोयस?" त्याने करड्या आवाजात विचारले.
"माफ करा साहेब, पण पिक्चर बघायला वेळ कुठे आहे इकडे. सकाळी पेपर टाकतो,
त्यानंतर दिवसभर एका छोट्या हॉटेलमध्ये काम करतो. मग
रात्रशाळेत शिकायला जातो." घरचा खर्चच भागायची मारामार आहे तिथे पिक्चर कुठून
बघणार ? आई नेहमी म्हणायची," जे
मिळवायचे ते कष्टाने मिळव. काटकसरीने खर्च कर, आपली ऐपत
नाहीये चैन करण्याची."
"मग तुला माझ्याबद्दल माहिती कशी काय मिळाली?"
"साहेब घरी एक खूप जुना छोटासा टीव्ही आहे. माझ्या वडिलांनी खूप
कष्टांनी पैसे गोळा करून आणला होता. पुढे एके दिवशी ते बेपत्ताच झाले घरातून.
शेजारचे म्हणतात दारूच्या नशेत असताना कुठल्यातरी गाडीने उडवलं असेल. आई मागच्या
वर्षी गेल्यापासून मीच करतो माझ्या आजीचं. साहेब, माझी आजी म्हणजे जुन्या काळाची
प्रसिद्ध हिरॉईन 'चंदाराणी'. दिवस
फिरलं की काय होतं बघा. आज एका झोपडीत, एका अंथरुणावर दिवस
काढते आहे. मला दिवसभर टीव्ही बघायला मिळत नसला तरी माझी आजी आवडीने तुमचे पिक्चर
बघतबसते. 'हा खरा अभिनय' वगैरे पुटपुटत
असते तुमचे काम बघताना. "तुम्हाला एकदातरी भेटायला हवं” असं म्हणत असते. ऐकता ऐकता त्या नटश्रेष्ठाच्या अंगावर मूठभर मांस चढलं.
त्याचा 'अहं' दोन पायऱ्या आणखी वर
चढला.
मुलगा बोलतच होता, "साहेब, परवा माझ्या आजीचा वाढदिवस. देव न करो पण हा तिचा शेवटचा वाढदिवस ठरू शकतो. मला तिला समाधानानं जगाचा निरोप घेताना बघायचंय. तिला काहीतरी भेट द्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत. साहेब, तुम्ही एकदा तिला भेटायला याल का ? एका मित्राने सांगितलं तुमचं शूटिंग इकडे सुरु आहे म्हणून आलो विनंती करायला. आलात तर फार ..." पण त्याचं वाक्य पूर्ण झालंच नाही. पुढचे शब्द अश्रूंच्या लोटात पार वाहून गेले ...समोर बसलेला तो 'नटसम्राट' ते पाहून अगदी गलबलून गेला. पिक्चरमधल्या एखाद्या भावुक सीनसाठी ग्लिसरीनशिवाय अश्रू त्याने कैकवेळा काढले होते, पण एखाद्याचं दुःख पाहून त्याचे डोळे प्रथमच आर्द्र झाले होते. त्याचा हात पाकिटाकडे गेला, हे पाहून तो मुलगा निर्धाराने म्हणाला, " नाही साहेब, पैसे नकोत. एकदा आजीला दर्शन दिलंत तरी उपकार होतील. आई म्हणायची फुकटच्या पैशांनी लाचारी येते. बघा साहेब. इच्छा झाली तर मला सांगा उद्या. मी नेईन तुम्हाला घरी." असे म्हणून तो उठला, व्हॅनिटीचं दार खटपट करून उघडून निघूनही गेला ! इकडे तो अभिनेता अगदी मूक झाला होता. इतके दिवस काचेपलीकडचं दृश्य दिसावं पण आवाज ऐकू येऊ नये असं झालं होतं त्याचं आज पहिल्यांदाच एका वंचिताची आर्त हाक त्याच्या कानावर पडली. होती त्याने त्या मुलाच्या घरी जाण्याचा निश्चय केला.
********
"आज्जी, ए आज्जी.... घरी कोण आलंय बघ तरी." मुलाने
खच्चून आरोळी ठोकली. आजी जाड भिंगाच्या चष्म्यातून एका पुराणकालीन टीव्हीवर
अमुककुमारचाच जुना देमारपट बघत बसली होती. पुन्हा एकदा त्याचा अहंकार कुरवाळला
गेला. टीव्हीचा आवाज फुल्ल होता. तरीही त्यातलं आजीला ऐकू कितपत येत होतं शंकाच
होती. पण अमुककुमारची तक्रार नव्हती. कारण एकदा त्याने इथे यायचं ठरवलं म्हटल्यावर
तिथे असेल ते असेल तसे स्वीकारायची त्याने तयारी केली होती. काळ शूटिंग संपल्यावर
त्याने बाहेर ताटकळत उभ्या असलेल्यात्या मुलाला आपण त्याच्या घरी येत असल्याचं
कळवलं होतं. फक्त बोभाटा नको म्हणून त्याने सोबत स्वतःची कार / व्हॅनिटी वगैरे
घेतली नव्हती. कुणी ओळखू नये म्हणून मेकअपमनच्या मदतीने खोटी मिशी आणि अस्ताव्यस्त
पसरलेली दाढी चिकटवून, डोक्यावरची टोपी डोळ्यांपर्यंत ओढून मेकअपमनच्याच गाडीतून
तो इकडे आला होता.कुठल्याही अपेक्षेशिवाय कुणाला तरी केलेल्या मदतीचं वेगळंच सुख
त्याला आज मिळत होतं .
मुलाने आजीचं लक्ष वेधून घेतल्यावर अभिनेत्याने आपली गॉगल-टोपी काढून, दाढी-मिशी उतरवली. आजी त्याच्याकडे पाहून थक्कच झाली.चष्म्याआडचे डोळे लुकलुकले, ओठ थरथरले. "बघ मी म्हणालो होतो ना तुला भेटायला त्यांना घेऊन येईन म्हणून. दे बरं मला माझं बक्षीस. आजीने त्या भारलेल्या अवस्थेतच आपल्या गळ्यातल्या धाग्याला असलेली एक चावी काढून त्या मुलाला दिली आणि अचानक एक झटका देऊन जमिनीवर कोसळली. पोरगा बावरला. तो घाईघाईत म्हणाला., "साहेब, आजी बेशुद्ध पडली आहे. आता डॉक्टरला बोलावण्यावाचून इलाज नाहीये. डॉक्टर पैशांशिवायव्हिजिटला यायला तयार होत नाहीत. या पलंगाखालच्या आजीच्या ट्रंकमध्ये आहेत थोडेसे पैसे आजीचे. इतके दिवस आज्जी म्हणायची, 'मी मेल्यावर घेऊन टाक ट्रंकमध्ये जे काही आहे ते'. पण आता इलाज नाही. ते पैसे आता काढले नाहीत तर तिच्या जिवाचं काही बरंवाईट व्हायचं." बोलता बोलता त्याने ट्रंकचं दांडगं कुलूप उघडलं. आतल्या पिशवीत डोकावून पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. "साहेब मी आलोच डॉक्टरांना घेऊन ?"असे म्हणून घराबाहेर पडलासुद्धा !
हे सगळं इतकं वेगाने झालं होतं की अमुककुमारला आणि त्याच्या मेकअपमनला काही
सुधरलंच नव्हतं.मग त्यांनी म्हातारीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपून तिला थोडंसं
सावधकेलं. अर्थात अजूनही अजूनही ती माणसात आल्यासारखी वाटतनव्हती. तिला उचलून त्या
पलंगावर निजवून दोघेही मुलाची वाट बघतबसले होते. डॉक्टर आल्यावर त्यांनी आपल्याला
ओळखू नये म्हणूनत्या अभिनेत्याने पुन्हा एकदा आपला गेटअप चेहऱ्यावर आणिडोक्यावर चढवला
होता. त्याला आता त्या मुलाची काळजी वाटायला लागली होती. 'पैसे देऊनसुद्धा
डॉक्टरने यायला नकार दिला असेल का? आपलं चुकलंच आपणच जायला पाहिजे
होतं सोबत. इथे कुणाची मदत मागावी का? पण इथलं आपल्याला
काहीच माहित नाही' तो चुळबुळत तसाच बसून राहिला.इतक्यात
बाहेरून एक बाई ठणाणा करत आली अन् याच झोपडीत शिरली. झोपडीत शिरताच एका
टोपीवाल्याला आणि सोबत एका लहाखुऱ्या निर्विकार माणसाला पाहून ती जरा वरमली.
"तुम्ही पाव्हणे दिसताय?" तिने विचारले.
"अं ? हं .... हो... म्हणजे या मुलाची अलीकडेच ओळख झाली तर ... तो म्हणाला की घरी चला, आजीला मदत करायला" अमुककुमार मूळचा आवाज शक्य तितका लपवत म्हणाला.
"अगं बाई, आजींना पुन्हा काय झालं?"
"बघा ना... काय अवस्था. एकेकाळची एवढी हिरोईन, आणि काय ही आजची अवस्था ! “ त्याच्या आवाजात सहानुभूती होती.
ती बाई चकित झाली. म्हणाली "हिरॉईन ? हां हां हां ... आजींना भ्रम होतो कधीतरी. दिवसभर टीव्ही बघितल्याचा परिणाम, दुसरं काय ? बिच्चाऱ्या....वेळ तरी कसा जाणार म्हणा." अभिनेत्याला कळेना मुलानं असं सांगितलं म्हणून. 'कदाचित पोरानं उत्साहाच्या भरात सांगितलं असेल. जाऊदे. आजीची मला भेटायची इच्छा तर पूर्ण झाली ना!'
"पण मी म्हणते, हा कार्टा परत गेला कुठे ?" बाईच्या गडगडाटीआवाजाने तो भानावर आला "चार दिवसांपासून आमच्या संतोषचे कपडे मागून घेतलेत, वाढदिवस आहे म्हणून. एरवी फिरत असतो कळकट कपड्यात. मी बाहेर गेले होते. परत येताना कळलं हा पठ्ठ्या घरी आलाय म्हणून तडक इकडे आले. तर हा परत गायब."
तो पुन्हा चक्रावला. 'म्हणजे ते स्वच्छ कपडे त्याचे नाहीत? जाऊदे. बिचारा इतका गरीब आहे की, उधार मागावे लागत असतील.....' असा विचार मनाशी करून तो त्या बाईला म्हणाला, “जाऊदे हो. आईवडिलांच्या सावलीशिवाय होरपळतंय पोर. एकट्याच्या कमाईवर किती रेटणार ? शेवटी आजीच्या ट्रंकेते पैसे काढावे लागले. डॉक्टरांना बोलवायचे म्हणून." त्याच्या तोंडून उत्स्फूर्तपणे डायलॉग बाहेर पडत होते.
बाईने चेहरा चमत्कारिक केला, "अहो बोलताय काय ? तुम्हाला काहीच माहित नाही या मुलाबद्दल? आईवडील दोघे मजुरी करतात म्हणून कसंबसं भागतंय कुटुंबाचं. हा मुडदा तर साक्षात कली आहे. बघावं तेव्हा पैशाकडे डोळा. शाळासुद्धा सोडून दिलीये. बाजूच्या नाक्यावरच्या उनाडपोरांच्या संगतीत असतो. सोळा वर्षांचाही नाही झाला अजून पण पत्त्यांचा जुगार खेळायला शिकलाय."

तो अवाक् होऊन ऐकत होता. बाईचा पट्टा सुरूच होता. "ट्रंक उघडली
म्हणता ? इतके दिवस बापासमोर आजीला चावी मागायची हिम्मत
नव्हती.आई बाप गावी गेल्यावर मेल्यानं डाव साधला. आजीला खूप आमिषं दाखवली. इतके
दिवस त्याही घट्ट होत्या. नातवाचे प्रताप ओळखून होत्या. मग आजच पोराला चावी कशी
दिली? देवा देवा देवा .... आतलं डबोलं पळवलं का काय ?
आणि माझ्या संतोषचे कपडेपण लांबवले वाटतं .... मुडद्या, कुठं फेडशील रे ही पापं!!! हरामखोरा ssss “ आणि तिची
ती शिव्यांची लाखोली सुरूच राहिली.
मेकअपमन अजूनही मख्खासारखा उभा होता. श्रेष्ठतम अभिनेत्याचा चेहरा खर्र्कन उतरला होता ... गेल्या काही वेळातल्या घडामोडींनी पार सर्द होऊन गेला होता. त्या मुलावरच्या विश्वासाच्या पायावची वीट न् वीट खिळखिळी झाली होती.'म्हणजे, इतक्या दिवसांचा त्याचा तो भावुक, व्याकुळ चेहरा ? त्याचीती आर्जवं, त्याच्या डोळ्यातून येणारं ते खळखळतं पाणी ? ते विलक्षण मॅच्युअर बोलणं ? ते सगळं ढोंग होतं ? छे छे .. हा तर त्याचा अभिनय. मलाही नाही बरं जमला तो या तोडीचा अभिनय इतक्या वर्षांत ..... !!' एकाएकी तो मट्कन खालीच बसला... इतका मोठा अभिनेता…अभिनेता नंबर वन ... छे छे , अगदी अभिनयातली पहिली दहा स्थाने व्यापून बसलेला नटसम्राट तो, पण आज स्वतःच्या डोळ्यांदेखत त्यानेआपल्या डोक्यावरचा सर्वश्रेष्ठतेचा मुकुट पळवून नेताना त्या मुलाला बघितलं होतं. त्याच्यावर मात करणारा 'तमुककुमार' पंधरा वर्षांपूर्वीच जन्माला आला होता तर !!!

अप्रतिम कथा.. आवडली
ReplyDeleteभारीच
ReplyDeleteएकदम वेगळ्याच वळणावर घेऊन गेली ही कथा! "अमुककुमार" पेक्षा 'तमुककुमार'चा प्रताप थक्क करणारा होता����
ReplyDelete'गोष्ट छोटी... पण डोंगराएवढी' आणि तितक्याच वेगाने जमीनीवर आणणारी����
धन्यवाद विकास, अम्या आणि सुधन्वा
ReplyDelete