आयबीएन लोकमतवर गब्बरसिंगच्या जागी एके हंगल आले आहेत, हे एव्हाना ते चॅनेल बघणे सोडलेल्या लोकांच्या लक्षात आलेच असेल.
तर या हंगलचाचांनी महाराष्ट्र दिनी मुलाखतीला (जिला बोलावणे तुम्ही कितीही कल्पनाविस्फोट केला तरी तुम्हाला सुचणार नाही अशा) एका पूर्वाश्रमीच्या मराठी असलेल्या आणि मावळते सावकार रघुरामशेठच्या 'सेक्स अपील' वर भाळलेल्या चकमक पुरंध्रीला बोलावले होते. (नुकतेच मराठी सिनेमाला prime time मिळण्यासाठी सरकारने केलेल्या निर्णयाला मावशींनी 'हुकूमशाही' म्हणून आपले मराठीप्रेम व्यक्त केले होते त्याबद्दलचे हे बक्षीस असावे).
आहाहा काय ते स्वच्छ सुबक मराठी !!
तब्बल पंधरा टक्के मराठी शब्द...
जणू पोह्यावर नायलॉनची सूक्ष्म शेव पखरावी तशी इंग्रजीवर मराठी भूर्भुरवलेली... (नमक स्वाद अनुसार !). ..
हंगलचाचा म्हैसुरपाकासारख्या तुपकट आणि उत्कट चेहऱ्याने (म्हणजे नेहमीसारखेच) ती मौक्तिके टिपत होते.
एकूणच
मराठी भाषा सुरक्षित हातात असल्याची खात्री त्या दिवशी पटली.

आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आता परवाच ऑलिम्पिकसंदर्भात व्यक्त
केलेल्या अतिशय उत्साहवर्धक मतांमुळे त्या तिलोत्तमेला चाचाजी पुन्हा
चॅनेलवर मुलाखतीसाठी बोलावणार असून 'भारतीय क्रीडाक्षेत्राची झेप - सुपर
मारिओ ते रिओ' ते या विषयावर ती आपली अभ्यासपूर्ण मते मांडणार असल्याचे
कळते.
आपले क्रीडाक्षेत्रदेखील खंबीर हातात असल्याची खात्रीच होत आहे....
टीप :
हंगलचाचांचे नाव ओळ्खणाऱ्यांयापैकी भाग्यवान विजेत्यास साजूक तुपातला मुगाचा एक किलो हलवा
आणि
रंभेचे नाव ओळ्खणाऱ्यास तिने लिहिलेल्या 'वी आर गोईंग आउट बरं का रे मॅकमिलन' हे प्रवासवर्णन आणि 'लीव्ह माय पदर, लीव्ह माय पदर' हे बंडखोर आत्मचरित्र बक्षीस मिळेल
(१० ऑगस्ट २०१६ ची पोस्ट)

No comments:
Post a Comment